SAMYAK PUNE

सम्यक संस्थेचे कार्य

सम्यक संस्थेचे कार्य

सम्यक या स्वयंसेवी संस्थेचे कार्यालय असावे या हेतूने २०, २१, ग्राफिकॉन आर्केड , ससून रोड, जहांगीर रुग्णालयासमोर पुणे १ येथे संस्थेच्या कार्यालयासाठी जागा मालकी हक्काने घेण्यात आली.

तेथे गरीब व कष्टकरी झोपडपट्टी विभागात राहणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अत्याधुनिक संगणक कक्ष उभारण्यात आला त्यात मोफत संगणक शिक्षण देण्यात आले. मिटकॉन व एम. के. सी. एल. चे अभ्यासक्रम शिकवण्याचा कार्यक्रम राबविण्यात आला.

संविधान साक्षरता वाढविण्यासाठी भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे मोफत वाटप करण्यात आले. २६ नोव्हेंबर या संविधान दिनाचे औचित्य साधून विविध मान्यवरांचे सत्कार करण्यात आले. प्रदर्शनांचे आयोजन करण्यात आले.

प्रत्येक वर्षी १५ ऑगस्ट या स्वातंत्र्यदिनी व २६ जानेवारी या प्रजासत्ताक दिनी ध्वजवंदनाचे कार्यक्रम आयोजित करण्यात येतात. त्याच प्रमाणे समायोजित भाषणे सुद्धा होतात. अशा राष्ट्रीय सणांचे वेळी संस्थेतर्फे अल्पोपहाराचे कार्यक्रम आयोजित करण्यात येतात.

दरवर्षी १४ एप्रिल डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती दिनी, ६ डिसेंबर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुण्यतिथी दिनी, २६ नोव्हेंबर संविधान दिनी त्याच प्रमाणे धम्मचक्र प्रवर्तन दिनी पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पूर्णाकृती पुतळ्याला पुष्पांची सजावट केली जाते.

सुशिक्षित बेरोजगार तरुण व तरूणींना शासकीय योजनांची माहिती करून दिली जाते.

लघुउद्योग त्याचप्रमाणे स्वयंरोजगार करण्यासाठी कार्यशाळा व शिबिरे भरविण्यात आली.

कोरोना कालावधीमध्ये १ ल्या व २ ऱ्या लाटेच्या वेळी गोरगरीब व गरजुंना जीवनावश्यक वस्तू व अन्न धान्याच्या किट अनुक्रमे ५०० व १००० वाटण्यात आल्या.

झोपडपट्टीत राहणाऱ्या लहान विद्यार्थ्यांना सहलीचा अनुभव घेता यावा यासाठी सहलीचे आयोजन शाळांच्या सहकार्याने करण्यात आले.

Other Websites
www.sanvidhansspune.in